माझ्यावरील कारवाईमागे राजकीय षड्यंत्र आहे, असा आरोप माजी पोलीस अधिकारी संजय पांडे यांनी केला आहे. पांडे यांनी दिल्लीतील एका न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांना एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती.
पांडे म्हणाले की, ‘‘मी, अनेक हायप्रोफाईल व राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांची चौकशी केली आहे. मी, इमानदारीने आपले कर्तव्य बजावले आहे; मात्र राजकीय षड्यंत्राने माझ्याविरोधात ही कारवाई केली आहे,” असा आरोप त्यांनी केला. ‘‘हे सर्व प्रकरण २००९ ते २०१७ च्या दरम्यानचे आहे. आता त्याची चौकशी २०२२मध्ये सुरू आहे. याचाच अर्थ हे सर्व प्रकरण राजकीय षड्यंत्राचा भाग आहे,’’ असेही पांडे म्हणाले. पांडे यांचे वकील आदित्य वाधवा व सिद्धार्थ सुनील यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. यात पांडे यांची कोणतीच चूक नसून राजकीय सुडातून हा खटला दाखल केल्याचे म्हटले आहे.