Bharat Jodo : राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेत संजय राऊत सहभागी; म्हणाले, मला भरून आलं

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा ही आता अंतिम टप्प्यात आली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेदेखील यात्रेत हजेरी लावणार
Bharat Jodo : राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेत संजय राऊत सहभागी; म्हणाले, मला भरून आलं
@INCIndia

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यात आली आहे. अशामध्ये आज त्यांची भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये पोहचली आहे. विशेष म्हणजे, या यात्रेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतदेखील सहभागी झाले होते. आज सकाळी कठुआपासून यात्रेला सुरुवात झाली, तेव्हा ते दोघेही एकत्र आले.

यावेळी ते म्हणाले की, "राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काल सर्वांनी पाहिले की, हजारो तरुण हातात मशाली घेऊन पठाणकोटला जमले होते. खरतर, काँग्रेसचे चिन्ह मशाल नाही, ते शिवसेनेचं चिन्ह नाही. पण, तरुणांच्या हातामध्ये धगधगत्या मशाली पाहून मला भरून आलं." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

संजय राऊत यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गट हा जम्मूमध्येही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, "देशात काँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी होऊच शकत नाही. काँग्रेस हा देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. यामध्ये राहुल गांधींचे नेतृत्त्व तळपताना दिसते आहे. लोकं त्यांना स्वीकारत आहेत." पुढे ते म्हणाले की, "मी तुरुंगात असतानाही राहुल गांधी यांनी माझी चौकशी केली. ईडी चौकशीबाबत आम्ही आमचे अनुभव एकमेकांना सांगितले." दरम्यान, चार महिने फक्त टी शर्टवर काढले होते. मात्र, कठुआच्या थंडीपासून वाचण्यासाठी त्यांनी जॅकेट घातलेले पाहायला मिळाले. तर दुसरीकडे संजय राऊत हे गळ्यामध्ये भगव्या रंगाचा मफलर घालून यात्रेत सहभागी झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in