सरबजितच्या मारेकऱ्याची पाकमध्ये हत्या

पाकिस्तानमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेला भारतीय कैदी सरबजित सिंग याच्या हत्येतील आरोपी आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याचा जवळचा साथीदार आमिर सरफराज तांबा याची हत्या...
डाव्या बाजूला सरबजीत सिंग आणि उजव्या बाजूला आमिर तांबा.
डाव्या बाजूला सरबजीत सिंग आणि उजव्या बाजूला आमिर तांबा.ट्विटर
Published on

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेला भारतीय कैदी सरबजित सिंग याच्या हत्येतील आरोपी आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याचा जवळचा साथीदार आमिर सरफराज तांबा याची रविवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लाहोरमध्ये गोळ्या घालून हत्या केली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

लाहोरच्या इस्लामपुरा भागात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तांबा याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तांबा याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. तांबा आणि मुदस्सर यांची पुरेशा पुराव्याअभावी पाकिस्तान न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.

आमिर तांबाने केला होता सरबजितवर तुरुंगात हल्ला

सरबजित सिंग याचा लाहोरच्या जिना रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने २ मे २०२३ रोजी मृत्यू झाला. सरबजित सिंग याच्यावर कोट लखपत कारागृहात तांबा आणि अन्य कैद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घडविण्यात आलेल्या अनेक बॉम्बस्फोटांबद्दल सरबजित सिंग याला दोषी ठरवून पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in