सत्येंद्र जैन यांच्या अंतरिम जामिनाला मुदतवाढ

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे तपासाअंती ही अटक करण्यात आली होती
सत्येंद्र जैन यांच्या अंतरिम जामिनाला मुदतवाढ

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी २५ सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल एस. व्ही. राजू यांच्या विनंतीनंतर जामिनास मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला. ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी हे जैन यांच्या बाजूने पक्ष मांडत आहेत. त्यांनी देखील या निर्णयास अनुकूलता दर्शवली.

यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २५ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. तसेच न्यायालयाने या प्रकरणातील अन्य आरोपी अंकुश जैन यांना चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करून सुटकेचा मार्ग मोकळा केला. यांना देखील वैद्यकीय कारणासाठीच जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या मुलावर वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने २६ मे रोजी सत्येंद्र जैन यांना मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. प्रत्येक नागरिकाला त्याच्या पसंतीच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्याचा अधिकार असतो. असे सांगत न्यायालयाने हा जामीन मंजूर केला होता. नंतर २४ जुलै रोजी न्यायालयाने या जामिनास पाच आठवडे मुदतवाढ दिली होती. ईडीने गेल्या वर्षी ३० मे रोजी आप नेते सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे तपासाअंती ही अटक करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in