अखेर SBI ने निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला पाठवली

सुप्रीम कोर्टाच्या कडक पवित्र्यानंतर भारतीय स्टेट बँकेने मंगळवारी ५.३० वाजता निवडणूक रोख्यांची सर्व माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली आहे.
अखेर SBI ने निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला पाठवली
(संग्रहित छायाचित्र, PTI)

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या कडक पवित्र्यानंतर भारतीय स्टेट बँकेने मंगळवारी ५.३० वाजता निवडणूक रोख्यांची सर्व माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली आहे.

निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी एसबीआयने सुप्रीम कोर्टाकडे केली होती. ही याचिका रद्दबातल करून सुप्रीम कोर्टाने एसबीआयला १२ मार्चला सायंकाळपर्यंत निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला द्यायला सांगितली होती. एसबीआयने दिलेली माहिती आयोगाने १५ मार्चला सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपल्या वेबसाइटवर टाकावी, असे आदेश सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिले आहेत. आता निवडणूक आयोगाला १५ मार्चपर्यंत सर्व माहिती आपल्या वेबसाइटवर टाकावी लागेल.

एसबीआयने आमच्या आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्याविरोधात अवमानात्मक कारवाईचा इशारा सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिला होता.

सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने १५ फेब्रुवारीला निवडणूक रोख्यांची योजना रद्दबातल केली. ही योजना असंवैधानिक असल्याचे खंडपीठाने जाहीर केले. तसेच १२ एप्रिल २०१९ पासून आतापर्यंत खरेदी केलेल्या निवडणूक रोख्यांची तपशीलवार माहिती निवडणूक आयोगाला सोपवण्याचे आदेश एसबीआयला दिले होते.

एसबीआयने निवडणूक रोख्यांचे विवरण देण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in