एसबीआयची ग्रीन रुपया मुदतठेव योजना सुरु

ही योजना अनिवासी भारतीयांसह सर्व व्यक्तींसाठी खुली आहे आणि गुंतवणूकदारांना तीन वेगळ्या कालावधी निवडण्याची मुभा आहे.
एसबीआयची ग्रीन रुपया मुदतठेव योजना सुरु

मुंबई : देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने शुक्रवारी पर्यावरणासाठी अनुकूल प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने ग्रीन रुपया मुदतठेव योजना सुरू केली. बँकेने सांगितले की, ही योजना अनिवासी भारतीयांसह सर्व व्यक्तींसाठी खुली आहे आणि गुंतवणूकदारांना तीन वेगळ्या कालावधी निवडण्याची मुभा आहे. ११११ दिवस, १,७७७ दिवस आणि २,२२२ दिवसांची मुदत योजना असणार आहे. सध्या, ही योजना शाखांमधून उपलब्ध आहे आणि ती लवकरच योनो आणि ऑनलाइन बँकिंगसारख्या डिजिटल चॅनेलद्वारे उपलब्ध करून दिली जाईल, असे अध्यक्ष दिनेश खारा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in