Rajiv Gandhi case : राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व सहा दोषींची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश!

माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्या प्रकरणातील ६ आरोपींच्या सुटकेचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
Rajiv Gandhi case : राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व सहा दोषींची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश!

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी नलिनी आणि आर. पी. रविचंद्रन यांच्यासह सहा जणांच्या सुटकेचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हे आरोपी ३० वर्षाहून अधिक काळ तुरुंगवास भोगत आहेत. यामध्ये एस नलिनी, आरपी रविचंद्रन यांच्यासह संथन, मुरुगन, रॉबर्ट पायास, जयकुमार यांचा समावेश आहे. या प्रकरणातील सातवा दोषी एजी पेरारिवालन याची याआधीच सुटका करण्यात आलेली आहे.

राजीव गांधी हत्या प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहर सुटकेची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती. नलिनी यांनी १७ जूनला मद्रास न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान दिले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषीपैकी नलिनी श्रीहरची मुदतीपूर्वी सुटकेची याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची एलटीटीई संघटनेने तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे आत्मघाती बॉम्बहल्ल्याच्या मदतीने २१ मे १९९१ रोजी हत्या केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in