Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार; करमुसे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

अभियंता अनंत करमुसे मारहाण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार; करमुसे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

२ वर्षांपूर्वीच्या अनंत करमुसे (Anant Karmuse) मारहाण प्रकरणामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. कारण, पुन्हा या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता या मारहाणीप्रकरणी जितेंद्र आव्हाड चांगलेच गोत्यात सापडण्याची शक्यता आहे.

अभियंता अनंत करमुसे प्रकरणामध्ये राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना पुढील तपास करण्याचे आदेश देण्यात आले असून याचा अहवाल ३ महिन्यात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांचे सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी अनंत करसेंना मारहाण केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात पुन्हा तपासणी सुरु करावी, अशी मागणी केली होती.

नेमकं प्रकरण काय?

महाविकास आघाडीची सत्ता असताना ५ एप्रिल २०२०मध्ये अनंत करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मिडीयावर एक पोस्ट केली होती. यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकासह काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी घेऊन जात मारहाण केल्याची माहिती दिली होती. या प्रकरणी अनंत करमुसे यांचे अपहरण करत मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in