सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार; पण...

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून यामुळे आता उद्धव ठाकरेंची चिंता वाढणार का? हे २ आठवड्याने समजणार
सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार; पण...

आज एकीकडे सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. तर, दुसरीकडे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबद्दल दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच, या प्रकरणी पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती आणावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली. फक्त आमदार आणि खासदाराच्या संख्येवर आयोगाने निर्णय दिला. सदस्यसंख्या गृहीत धरली नाही, असा आक्षेप ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी घेतला होता. तर शिंदे गटाचे वकील निरज कौल म्हणाले की, 'न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करू नये. हे दहाव्या सुचीचे प्रकरण नाही.' यावेळी न्यायालयाने आयोगाचा निकाल मागितला. त्यानंतर न्यायालयाने ठाकरे गटाला दिलासा दिला. तसेच न्यायालयाने शिंदे गट आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. या प्रकरणात दोघांकडून उत्तरे मागवली आहेत. तसेच, यासंदर्भातील पुढील सुनावणी ही २ आठवड्यानंतर होणार आहे. हे २ आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करणार नसल्याचे आश्वासन शिंदे गटाचे वकील निरज कौल यांनी याबाबत न्यायालयात दिले. यादरम्यान शिंदे गटाला व्हिप देखील काढता येणार नाही, असेदेखील सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in