औषध निविदा प्रक्रियेत घोटाळा ; ऑल इंडिया फूड अँड ड्रग्ज फेडरेशनचा आरोप

मध्यवर्ती खरेदी विभागातील अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी
औषध निविदा प्रक्रियेत घोटाळा ; ऑल इंडिया फूड अँड ड्रग्ज फेडरेशनचा आरोप

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात रोज २५ हजार रुग्ण बाह्य ओपीडीत उपचारासाठी येत असतात; मात्र मुंबई महापालिकेकडे येणाऱ्या रुग्णांना देण्यासाठी इंजेक्शन, टेबलेट उपलब्ध नाहीत. नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जात नसून लोकल औषध विक्रेत्यांकडून औषधं खरेदी केली जातात. यामुळे लोकल औषध पुरवठा दाराकडे औषधसाठा उपलब्ध नसल्यास रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तीन वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया पारदर्शक होती, परंतु आता लोकल औषध पुरवठा दारांना हाताशी धरून औषधे खरेदी केली जात आहे. पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यातील काही डॉक्टर संगनमताने निविदा प्रक्रियेत घोटाळा करत असल्याचा आरोप ऑल इंडिया फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे. त्यामुळे मध्यवर्ती खरेदी विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या मलेरिया डेंग्यूची तपासणी करण्यासाठी लागणारे किट खरेदीसाठी ५० टक्के निविदा प्रक्रिया राबवली असून, ५० टक्के निविदा प्रक्रिया राबवणे आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मलेरिया व डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे ही ते म्हणाले.

पुरावा आयुक्तांना देणार

पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागात होत असलेल्या गैरव्यवहारांची सविस्तर माहिती कागदोपत्री पुराव्यासह पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांना मेल करणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.

रुग्णांचे हाल; पालिका जबाबदार

मुंबई महापालिकेच्या शेड्युल मध्ये २६७ प्रोडक्ट असून, ६० प्रोडक्ट अंतिम केले आहेत; मात्र या ६० प्रोडक्ट मध्ये इंजेक्शन, आयबी, ग्लोज, टॅबलेट, विशेष करुन लहान मुलांना देण्यात येणारे सिरप, ओआरएसचा साठा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे हा औषध साठा उपलब्ध नसताना पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने नवीन निविदा मागवलेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेच्या ५ मेडिकल कॉलेज, २० पेरिफेअल रुग्णालये, ३० मॅर्टनिटी होम व १५० आपलं दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांचे हाल होत असून, याला पालिका प्रशासन जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in