अदानीप्रकरणी सेबीचा सुप्रीम कोर्टाला अहवाल

२२ प्रकरणांचा तपास पूर्ण
अदानीप्रकरणी सेबीचा सुप्रीम कोर्टाला अहवाल

नवी दिल्ली : अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने अदानी समूहाविरोधात आपला अहवाल जाहीर केला. त्यानंतर अदानी समूहावर प्रश्न उपस्थित झाले. सेबीने या प्रकरणाचा तपास करून त्याचा ‘स्टेट‌्स‌’ अहवाल सुप्रीम कोर्टाला सादर केला आहे.

सेबीने सांगितले की, तपास पूर्ण झाला असून त्याचा अहवाल सोपवला आहे. सेबीने २४ प्रकरणांचा तपास केला असून २२ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे. फक्त दोन प्रकरणांचा रिपोर्ट तयार होत आहे. या दोन प्रकरणांच्या तपासासाठी सेबीला परदेशी संस्थांच्या अहवालाची गरज आहे.

या प्रकरणी सेबी अदानी समूहाच्या १३ परदेशी कंपन्यांची चौकशी करत आहे. यात अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांची माहिती मागवली आहे. त्यांचे अहवाल आल्यानंतर या दोन प्रकरणांच्या तपासाचा रिपोर्ट पूर्ण होईल.

सुप्रीम कोर्टाने १४ ऑगस्टला सेबीला अदानी प्रकरणाचा ‘स्टेट‌्स‌’ रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सेबीने न्यायालयाकडून १५ दिवसांची मुदत मागितली. या प्रकरणी सुनावणी २९ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in