‘कॅस’ फेरफारप्रकरणी SEBI ची कठाेर कारवाई; शेअर बाजारातील दोन संस्थांचे ₹ ३.६८ कोटी जप्त, सेन्सेक्सच्या क्लोजिंग प्राइसमध्ये नफा कमवल्याचा आरोप

शेअर बाजारातील अंतिम बंद भाव अधिक पारदर्शक करण्यासाठी लागू केलेल्या ‘क्लोजिंग ऑक्शन सेशन’ (कॅस) या नव्या यंत्रणेत फेरफार केल्याप्रकरणी सेबीने मोठी कारवाई केली आहे.
‘कॅस’ फेरफारप्रकरणी SEBI ची कठाेर कारवाई; शेअर बाजारातील दोन संस्थांचे ₹ ३.६८ कोटी जप्त, सेन्सेक्सच्या क्लोजिंग प्राइसमध्ये नफा कमवल्याचा आरोप
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : शेअर बाजारातील अंतिम बंद भाव अधिक पारदर्शक करण्यासाठी लागू केलेल्या ‘क्लोजिंग ऑक्शन सेशन’ (कॅस) या नव्या यंत्रणेत फेरफार केल्याप्रकरणी सेबीने मोठी कारवाई केली आहे.

सेबीने ‘कॉप्थॉल मॉरिशस इन्व्हेस्टमेंट लि.’ आणि ‘मानसी शेअर अँड स्टॉक ब्रोकिंग लि.’ या दोन संस्थांवर तत्काळ प्रभावाने अंतरिम आदेश जारी केला आहे.

या संस्थांनी १३ ऑगस्ट रोजी सेन्सेक्सच्या एक्स्पायरीच्या दिवशी आक्रमक ऑर्डर्स टाकून सेन्सेक्सचा बंद भाव बदलण्याचा आणि त्याद्वारे एफ अँड ओ पर्यायांमध्ये नफा मिळवण्याचा प्रयत्न केला. सेबीने कॉप्थॉलचा ₹२.९६ कोटी आणि मानसी ब्रोकिंगचा ₹७१.६५ लाख असा एकूण ₹३.६८ कोटींचा बेकायदेशीर नफा जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

दोन्ही संस्थांना पुढील आदेशापर्यंत इक्विटी सेगमेंटमधील ‘कॅस’मध्ये सहभागी होण्यास आणि भांडवली बाजारात व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही तातडीची अंतरिम कारवाई असून सेबी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. दोन्ही संस्थांना सेबीच्या या आदेशावर आपले उत्तर आणि आक्षेप नोंदवण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

१३ ऑगस्ट रोजी नेमके काय घडले?

१३ ऑगस्ट रोजी सेन्सेक्सचा रिफरन्स भाव ७७,८२९.६० होता, मात्र लिलावाच्या काळात कॉप्थॉलने सेन्सेक्सच्या सर्व ३० कंपन्यांमध्ये रिफरन्स प्राईसपेक्षा ३% जास्त दराने ₹२९१ कोटींच्या मोठ्या खरेदी ऑर्डर्स टाकल्या. अवघ्या काही सेकंदांत सेन्सेक्समध्ये तीन वेळा मोठी वाढ घडवून आणली गेली. कॉप्थॉलकडे सेन्सेक्स ‘कॉल ऑप्शन्स’ होते.

कॅस म्हणजे काय?

सेबीने ३ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने ‘कॅस’ ही नवी यंत्रणा सुरू केली आहे. या अंतर्गत दुपारी ३:१५ वाजता सामान्य ट्रेडिंग थांबते आणि ३:१५ ते ३:२० दरम्यान रिफरन्स प्राइस ठरवली जाते. ३:२० वाजता लिलाव सुरू होतो. यामध्ये शेअरच्या किमती ३% पर्यंत बदलू शकतात. ३:३५ वाजेपर्यंत कमाल शेअर्सची देवाणघेवाण होईल, असा एकच अंतिम बंद भाव निश्चित केला जातो.

  • कारवाई करणारी संस्था : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी)

  • आरोपी संस्था : कॉप्थॉल मॉरिशस (जेपी माॅर्गनची संलग्न संस्था) आणि मानसी शेअर अँड स्टॉक ब्रोकिंग

  • जप्त केलेली रक्कम : ₹३.६८ कोटी (बेकायदेशीर नफा)

  • संबंधित तारीख : १३ ऑगस्ट २०२६ (सेन्सेक्स डेरिव्हेटिव्ह्ज एक्स्पायरीचा दिवस)

  • प्रमुख कारण : ‘क्लोजिंग ऑक्शन सेशन’ (कॅस) दरम्यान मुंबई निर्देशांकाच्या अंकांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in