सेबीकडून एआयचा वापर सुरु, फसवणूक करणाऱ्यांना चाप बसणार

सेबीने तपासाला गती देण्यासोबतच अनेक क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केला
सेबीकडून एआयचा वापर सुरु, फसवणूक करणाऱ्यांना चाप बसणार

मुंबई : इक्विटी मार्केट नियमक सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) शेअर बाजारात फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सेबीने यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरण्यास सुरुवात केली असल्याचे सेबीचे सदस्य कमलेश चंद्र वार्ष्णेय यांनी सांगितले.

शेअर बाजारातील अनियमिततेवर कारवाई करत संस्थांविरुद्ध सेबी कारवाई करत आहे. गुंतवणूकदारांच्या विश्वासाच्या महत्त्वावर भर देऊन ते म्हणाले की जर ब्रोकर्सना विश्वास नसेल तर ‘सर्व काही अपयशी ठरेल’. भांडवली बाजारातील चुकीच्या पद्धती वापरण्याविरुद्ध त्यांनी इशारा दिला त्याचबरोबर, ब्रोकर्सनीही सतर्क राहून अशा प्रयत्नांना आळा घालण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.

सेबीने तपासाला गती देण्यासोबतच अनेक क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केला असून कमलेशचंद्र वार्ष्णेय म्हणाले की, विविध संस्थांनी तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांवर लक्ष ठेवले पाहिजे. नॅशनल एक्स्चेंज मेंबर्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात त्यांनी म्हटले की, पारदर्शकता आणणे आणि नियमांमधील फेरफार थांबवणे सेबीसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. बाजारातील कायद्याचे पालन केले तरच फायदा होईल तर उल्लंघन केल्यास समस्या निर्माण होतील.

बाजारात लोकांची दिशाभूल करणाऱ्यांचा पायबंद घालण्यासाठी सेबी कटिबद्ध असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगत सेबीचे पूर्णवेळ सदस्य वार्ष्णेय यांनी ब्रोकर्सना सतर्क राहण्याचे आणि दिशाभूल करण्याचे प्रयत्न रोखण्याचे आवाहन केले. तसेच यापूर्वी असे प्रयत्न करणाऱ्यांवर सेबीने सातत्याने कारवाई केली असून यामध्ये फ्रंट रनिंगचाही समावेश आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकायचा असून प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होईल ज्यामध्ये ब्रोकर्सचा सहभाग फार मोठा असेल. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्यास हे लवकरच थांबेल. यामध्ये काही ब्रोकर्सचा हात असू शकतो आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in