सेबीचा 'कॅफे कॉफी डे'ला दणका; ठोठावला इतक्या कोटींचा दंड

कॅफे कॉफी डेच्या सहयोगी कंपन्यांचे कोट्यवधीचे पैसे कंपनीत वापरल्यात आल्याचे सेबीच्या तपासात आढळून आले
सेबीचा 'कॅफे कॉफी डे'ला दणका; ठोठावला इतक्या कोटींचा दंड

सुप्रसिद्ध कॅफे 'कॅफे कॉफी डे' (सीसीडी) एंटरप्रायझेसला देशाच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी)ने मोठा दणका दिला आहे. सेबीने सीसीडीला तब्बल २६ कोटींचा दंड ठोठावला आहे. तात्काळ हा आदेश लागू केला असून यासाठी सीसीडीला ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सीसीडीने आपल्या ७ सहयोगी कंपन्यांचे पैसे म्हैसूर अ‍ॅमेलगमेटेड कॉफी इस्टेटमध्ये ट्रान्सफर केल्याचे सेबीच्या तपासामध्ये समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीसीडी एंटरप्रायझेसच्या ७ सह्योगी कंपन्यांचे अंदाजे ३५३५ कोटी एवढी रक्कम म्हैसूर अ‍ॅमेलगमेटेड कॉफी इस्टेटमध्ये ट्रान्सफर करण्यात आल्याचे तपासात आढळून आले. या कंपन्यांमध्ये कॉफी डे ग्लोबल, टेंग्लिन रिटेल रिअ‍ॅलिटी डेव्हलपमेंट्स, टेंग्लिन डेव्हलपमेंट्स, गिरी विद्युत (इंडिया) लिमिटेड, कॉफी डे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, कॉफी डे ट्रेडिंग आणि कॉफी डे एकॉन यांचा समावेश आहे. सेबीने कॉफी डे एंटरप्रायझेसला म्हैसूर अमलगमेटेड कॉफी इस्टेट्स लिमिटेडला दिलेले पैसे व्याजासह वसूल करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे आदेश दिले. तसेच, थकबाकीच्या रकमेच्या वसुलीसाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सेचेंजकडून ब्रोकर्स घेऊन स्वतंत्र कायदा फर्म नियुक्त करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in