आसारामच्या धमकीनंतर 'डिस्कव्हरी'च्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा

‘कल्ट ऑफ फिअर : आसाराम बापू’ हा माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर आसाराम बापूंच्या समर्थकांकडून ‘डिस्कव्हरी इंडिया’च्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत.
आसारामच्या धमकीनंतर 'डिस्कव्हरी'च्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा
Published on

नवी दिल्ली : ‘कल्ट ऑफ फिअर : आसाराम बापू’ हा माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर आसाराम बापूंच्या समर्थकांकडून ‘डिस्कव्हरी इंडिया’च्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्याचे आदेश गुरुवारी सुप्रीम कोर्टाने सात राज्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना दिले.

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने ‘डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडिया’ तसेच देशातील विविध राज्यांमध्ये राहणाऱ्या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर हे आदेश कोर्टाने दिले.

logo
marathi.freepressjournal.in