संसदेची सुरक्षा सीआयएसएफच्या १४० जवानांकडे

केंद्रीय गृहमंत्रालयाने संसदेच्या व्यापक सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या १४० जवानांची तुकडी संसदेच्या सुरक्षिततेसाठी मंजूर केली
संसदेची सुरक्षा सीआयएसएफच्या १४० जवानांकडे
PM

नवी दिल्ली : गेल्या १३ डिसेंबर रोजी काही जणांनी थेट संसदेत घुसून धुराच्या नळकांड्या जाळल्याच्या प्रकरणातून धडा शिकलेल्या सरकारने संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची व्यवस्थित झडती घेण्यासाठी तब्बल १४० सीआयएसएफ जवानांची तुकडीच सोमवारपासून तैनात केली आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने संसदेच्या व्यापक सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या १४० जवानांची तुकडी संसदेच्या सुरक्षिततेसाठी मंजूर केली आहे. या तुकडीने सोमवारपासून संसद संकुलाची सूत्रे हाती घेतली आहेत. संसदेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकजण आणि त्याच्या सामानाची झडती हे जवान घेणार आहेत. तुकडीचा असिस्टंट कमांडंट रँकचा अधिकारी ३६ जवानांच्या तुकडीचे नेतृत्व करणार आहे. सध्या हे जवान विद्यमान सुरक्षारक्षकांकडून कामाची माहिती करून घेत आहेत. जेणेकरून ३१ तारखेपासून हे जवान पूर्ण क्षमतेने काम करू शकणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in