एटीएसच्या प्रश्नावर सीमा हैदरच एकच उत्तर ; म्हणतेय, "मी..."

सीमा हैदर नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आल्यानं भारताच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात देखील अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत
एटीएसच्या प्रश्नावर सीमा हैदरच एकच उत्तर ; म्हणतेय, "मी..."
Published on

पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदर बाबत सध्या असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. एटीएसकडून सीमा हैदरची कसून चौकशी सुरु आहे. सीमा हैदर नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आल्यानं भारताच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात देखील अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा अनेक कारणांमुळे दहशतवादी विरोधी पथकाकडून सीमा हैदरची कसून चौकशी केली जात आहे.

एटीएसकडून सीमा हैदरची सुरु असलेल्या चौकशीत अजूनतरी काही महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. चौकशीवेळी सीमा प्रत्येक प्रश्नाला फक्त एकच उत्तर देत आहे. सीमाला एटीएसने कोणताही प्रश्न विचारला तरी तिच्याकडून फक्त एकच उत्तर येत आहे. सचिनच्या प्रेमापोटी ती भारतात आली, असं एकच उत्तर सीमा एटीएसच्या अधिकाऱ्यांना देत आहे. नोएडा पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान देखील सीमाने हेच उत्तर दिलं होतं. याप्रकरणी सचिन आणि सीमा यांना समोरासमोर बसवून क्रॉस क्वोटिंगही करण्यात आलं. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या चौकशीतून कोणतीही मोठी माहिती समोर आलेली नाही.

सीमा हैदर ही मे महिन्यात नेपाळमार्गे बैकायदेशीर रित्या भारतात आली. होती. त्यानंतर ती ग्रेटर नोएडा येथे प्रियकर सचिन सोबत राहत आहे. सीमाजवळ अनेक फोन आणि इतर गोष्टी सापडल्यानं यंत्रणांचा तिच्यावरील संशय बळावला आहे. यानंतर एटीएसकडून सीमाला ताब्यात घेण्यात आलं. ग्रेटर नोएडा पोलिसांनी ४ जुलै रोजी सीमा आणि सचिनला अटक केली होती. यानंतर ७ जुलै रोजी न्यायालयानं त्यांनी अंतरिम जामीन मंजुर केला होता. त्यानंतरआता एटीएसकडून त्यांची चौकशी सुरु आहे. पबजी गेम खेळताना सीमा हैदर आणि सचिन मीना यांची

logo
marathi.freepressjournal.in