
व्हाईट गुडस्साठीच्या निर्मितीसाठी पीएलआय योजनेअंतर्गत आणखी १५ कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील ५ वर्षांत २५,५८३ कोटींचे उत्पादन अपेक्षित असून सुमारे ४ हजार नवी रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज आहे.
व्हाईट गुड्स (वातानुकूलित यंत्रे आणि एलईडी दिवे) मध्ये पीएलआय योजनेच्या दुसऱ्या फेरीत दुसऱ्या फेरीत प्राप्त झालेल्या १९अर्जांच्या मूल्यमापनानंतर, १३६८ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या योजनेत १५ अर्जदार कंपन्या निवडण्यात आल्या. यामध्ये ९०८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एसीसाठी लागणाऱ्या भागांच्या निर्मितीसाठी सहा कंपन्याचा तर ४६० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह एलईडी लाइट्सच्या घटकांचे उत्पादन करणाऱ्या ९ कंपन्यांचा समावेश आहे. या १५ कंपन्यांचे पाच वर्षांत २५,५८३ कोटी रुपयांचे एकूण उत्पादन होईल आणि ४ हजार लोकांसाठी अतिरिक्त थेट रोजगार निर्माण होईल. चार अर्जदारांना तज्ज्ञांच्या समितीकडे परीक्षेसाठी आणि त्यांच्या शिफारशींसाठी पाठवले जात
आहे. पीएलआय योजनेमुळे या विभागांमधील देशांतर्गत मूल्यवर्धन सध्याच्या १५ ते २० टक्क्यांवरुन ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असे आज उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे अतिरिक्त सचिव अनिल अग्रवाल यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले. पहिल्या फेरीत ५२ कंपन्यांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते आणि ५,२६४ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ४६ अर्जदारांची निवड करण्यात आली होती.