दिल्लीत आपच; सरकारने विश्वासमत प्रस्ताव जिंकला

गुरूवारी सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात होताच भाजप आमदार मद्य घोटाळ्याप्रकरणी आक्रमक झाले
दिल्लीत आपच; सरकारने विश्वासमत प्रस्ताव जिंकला

अबकारी धोरणावरून दिल्लीत सुरू असलेल्या घमासानच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल सरकारने गुरूवारी विधानसभेत दाखल विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यात सरकारच्या बाजूने ५८ मते पडली. तर भाजपने मतदानावर बहिष्कार टाकला. ७० सदस्यीय दिल्ली विधानसभेत आपचे ६२ व भाजपचे ८ आमदार आहेत.

गुरूवारी सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात होताच भाजप आमदार मद्य घोटाळ्याप्रकरणी आक्रमक झाले. त्यानंतर उपाध्यक्ष राखी बिर्ला यांनी भाजपच्या २ आमदारांना मार्शलकरवी सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर विधुरी म्हणाले की, मद्य घोटाळा २ हजार कोटींचा आहे; पण आमच्या आमदारांची मुस्कटदाबी केली जात आहे.

दिल्ली विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू असताना भाजप नेत्यांनी रस्त्यावर निदर्शने केली. ‘आप’चे सर्वच आमदार नायब राज्यपालांना भेटणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in