'त्या' मूर्खाला उत्तर प्रदेशात पाठवा, आम्ही त्याचा इलाज करतो! अबू आझमींवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतप्त

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या एका विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले असतानाच त्याचे तीव्र पडसाद बुधवारी उत्तर प्रदेशमध्येही उमटले.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
Published on

लखनौ : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या एका विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले असतानाच त्याचे तीव्र पडसाद बुधवारी उत्तर प्रदेशमध्येही उमटले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भर विधानसभेतच अबू आझमी यांच्यावर सडकून टीका केली. अबू नामक मूर्खाला उत्तर प्रदेशात पाठवा, आम्ही येथे त्याचा इलाज करतो, असे आदित्यनाथ म्हणाले.

औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, असे अबू आझमी यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या विधानसभेतही पडसाद उमटले. एवढेच नव्हे तर विरोधकांनी विधानसभेच्या बाहेर आंदोलन करत अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. उत्तर प्रदेश विधानसभेतअबू यांच्या वक्तव्यावरून गदारोळ माजला.

logo
marathi.freepressjournal.in