काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनी सातव यांचे निधन

माजी राज्यमंत्री रजनी सातव यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये एका वेळेस विधानसभा आणि एकदा विधान परिषदेचे प्रतिनिधीत्व केले. त्या आरोग्य राज्यमंत्रीही होत्या.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनी सातव यांचे निधन

नांदेड : महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनी सातव यांचे रविवारी वयाच्या ७५ व्या वर्षी नांंदेड येथे अल्प आजाराने निधन झाले. उद्या सोमवारी दुपारी कळमनुरीमधल्या विकास नगर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

आज सकाळी त्यांना उपचारासाठी नांदेडमधील काबदे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे तेथे निधन झाले. त्या दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या मातोश्री होत्या. प्रज्ञा सताव या त्यांच्या स्नुषा होत. माजी राज्यमंत्री रजनी सातव यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये एका वेळेस विधानसभा आणि एकदा विधान परिषदेचे प्रतिनिधीत्व केले. त्या आरोग्य राज्यमंत्रीही होत्या. काँग्रेसमध्ये प्रदेश संघटनेत त्यांनी अनेक वर्षे काम केले होते. काँग्रेस पक्षात काम करत असतानाच त्यांनी आपले चिरंजीव दिवंगत राजीव सातव यांना संघटनेच्या कामात सक्रिय केले होते. आता त्यांची सून आमदार प्रज्ञाताई सातव यादेखील काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत. सातव कुटुंब गेल्या ४३ वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत. सातव कुटुंबाला गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जाते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in