सपा नेते आझम खान यांना सात वर्षे कारावासाची शिक्षा

न्यायालयाने सपाचे नेते आझम खान यांना सोमवारी सात वर्षे कारावास आणि आठ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सपा नेते आझम खान यांना सात वर्षे कारावासाची शिक्षा
(संग्रहित छायाचित्र)
Published on

रामपूर (उत्तर प्रदेश) : डुंगरपूर येथे २०१६ मध्ये जबरदस्तीने एक घर जमीनदोस्त केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने सपाचे नेते आझम खान यांना सोमवारी सात वर्षे कारावास आणि आठ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

याच प्रकरणी न्यायालयाने अन्य तीन आरोपींना पाच वर्षे कारावास आणि प्रत्येकी अडीच लाख रुपये दंड ठोठावला आहे. उत्तर प्रदेशात सपाचे सरकार सत्तेवर असताना आझम खान यांनी २०१६ मध्ये जबरदस्तीने एक घर जमीनदोस्त केले होते. त्याप्रकरणी २०१९ मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in