दोलायमान स्थितीनंतर सेन्सेक्स ५४ अंक वधारुन बंद

३०-शेअर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेरीस ५४.१३ अंक किंवा ०.०९ टक्का वधारुन ५९,०८५.४३वर बंद झाला
दोलायमान स्थितीनंतर सेन्सेक्स ५४ अंक वधारुन बंद

जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात बुधवारी दोलायमान स्थितीनंतर सेन्सेक्स ५४ अंक वधारुन बंद झाला. दरम्यान, भारतीय चलन बाजारात बुधवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २ पैसे घसरुन ७९.८५वर बंद झाला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेरीस ५४.१३ अंक किंवा ०.०९ टक्का वधारुन ५९,०८५.४३वर बंद झाला. दिवसभरात तो ५९,१७०.८७ ही कमाल तर ५८,७६०.०९ ही किमान पातळीवर गेला होता. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी २७.४५ अंक किंवा ०.१६ टक्का वाढून १७,६०४.९५वर बंद झाला.

सेन्सेक्स वर्गवारीत इंडस‌्इंड बँक, एनटीपीसी, लार्सन ॲण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक आणि एशियन पेंट्स‌ यांच्या समभागात मोठी वाढ झाली. तर टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टायटन, सन फार्मा आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समभागांमध्ये घसरण झाली. आशियाई बाजारात शांघाय, टोकियोमध्ये घसरण तर सेऊलमध्ये वाढ झाली होती. तर युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत घसरण झाली होती. वॉल स्ट्रीटमध्ये मंगळवारी घट झाली होती. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.०४ टक्के वधारुन प्रति बॅरलचा भाव १०१.३ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी मंगळवारी ५६३ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in