
सेन्सेक्स, निफ्टीची चार दिवसांची तेजी बुधवारी थांबली. सेन्सेक्स सकाळी १२००हून अधिक अंकांनी कोसळल्यानंतर बंद होण्यापूर्वी सावरला गेला. त्यामुळे मोठी घसरण झाली नाही. अमेरिकेत महागाई दरात किंचित वाढ झाली आहे. वाढत्या महागाईला आवर घालण्यासाठी अमेरिकेतही व्याजदरवाढीच्या भीतीने आणि भारतातही व्याजदरवाढ होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा करण्यात आला. माहिती तंत्रज्ञान आणि फार्मा कंपन्यांच्या समभागांची विक्री झाली. घाऊक भारता घाऊक महागाईत दरम्यान, भारतीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ३० पैशांनी घसरुन ७९.४७ वर बंद झाला.
दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स सकाळी बाजार उघडल्यानंतर १२००हून अधिक अंकांनी कोसळल्यानंतर बंद होण्यापूर्वी २२४.११ अंक किंवा ०.३७ टक्का घसरुन ६०,३४६.९७ अंकांवर बंद झाला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ६६.३० अंक किंवा ०.३७ टक्का घटून १८,००३.७५ वर बंद झाला.
अमेरिकी शेअर बाजारातील घसरणीमुळे बुधवारी भारतीय बाजारतही जोरदार घसरण झाली. बुधवारी बीएसईचा सेन्सेक्स मुंबई शेअर बाजार उघडल्यानंतर सुरुवातीला १,१५३.९६ अंक किंवा १.९१ टक्क्यांच्या घसरणीसह ५९,४१७ वर उघडला. दुसरीकडे, एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी २९८.९० अंकांच्या किंवा १.६५ टक्क्यांच्या घसरणीसह १७,७७१वर उघडला. मात्र, शेअर बाजार सुरुवातीच्या मिनिटांत सुधारणा दाखवत ५ मिनिटांतच सेन्सेक्स ६५८ अंकांनी किंवा १.०९ टक्क्यांनी घसरून ५९,९१२वर आला होता. दुसरीकडे, निफ्टी १८९ अंकांनी १.०५ टक्क्यांनी घसरून १७,८८ वर आला होता.
सेन्सेक्स वर्गवारीत इन्फोसिसचा समभाग ४.५३ टक्के घसरला. तर त्यानंतर टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एल ॲण्ड टी, विप्रो आणि रिलायन्स यांच्या समभागात घसरण झाली. तर इंडस्इंड बँक, पॉवरग्रीड, एनटीपीसी, एसबीआय, कोटक बँक आणि एचडीएफसी, एचडीएफसी बँक यांच्या समभागात वाढ झाली.
आशियाई बाजारात टोकियो, हँगसेंग इंडेक्स, शांघायमध्ये घसरण झाली. विदेशी गुंतवणूक संस्थांनी मुंबई शेअर बाजारात मंगळवारी १९५६.९८ कोटींच्या समभागांची खरेदी केली.