लष्कराची गाडी दरीत कोसळल्यामुळे सात जवानांचा मृत्यू
ANI

लष्कराची गाडी दरीत कोसळल्यामुळे सात जवानांचा मृत्यू

Published on

लडाखच्या तुरतुक सेक्टरमध्ये लष्कराची गाडी दरीत कोसळल्यामुळे सात जवानांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली आहे. तर अन्य १९ जवान जखमी झाले आहेत. या गाडीत एकूण २६ जवान प्रवास करत होते. जखमी जवानांना चांगले उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सैन्याच्या सूत्रांनी दिली आहे.

शुक्रवारी सकाळी ९ वाजता जवानांचा हा ट्रक परतापूर येथील ट्रान्झिट कॅम्पवरून हानिफ सेक्टरकडे जात होता. जेव्हा हा ट्रक थोईसपासून २५ किलोमीटर दूर आला. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक ५० ते ६० फूट खोल श्योक नदीत पडला. यात सात जवानांचा जागीच मृत्यू झाला. यात सातारा जिल्ह्यातील सुभेदार विजय शिंदे यांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in