अनेक मोबाईल, एक चार्जर; केंद्र सरकार काढणार युनिव्हर्सल चार्जरसाठी नवे नियार

कंपन्यांना मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब्लेट, ब्ल्यूटूथ, इअरफोन इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी एकसारखे चार्जर तयार करावे लागतील
अनेक मोबाईल, एक चार्जर; केंद्र सरकार काढणार युनिव्हर्सल चार्जरसाठी नवे नियार

अनेक कंपन्यांचे मोबाईल, लॅपटॉप आपण खरेदी करतो. ते केल्यानंतर सर्वात मोठी समस्या उभी राहते चार्जरची. कारण आपण प्रत्येकवेळी चार्जर बाळगत नाही. तसेच एका कंपनीचा चार्जर दुसऱ्या कंपनीच्या मोबाईला लागत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार मोबाईल, लॅपटॉप व अन्य यंत्रांना एकच चार्जर लागेल, असा नियम करणार आहे. केंद्र सरकार सर्व युनिव्हर्सल चार्जर स्वीकारण्यासाठी नवे नियम तयार करणार आहे.

त्यानुसार कंपन्यांना मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब्लेट, ब्ल्यूटूथ, इअरफोन इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी एकसारखे चार्जर तयार करावे लागतील. वर्षाच्या सुरुवातीलाच युरोपीय संघटनेने युनिव्हर्सल चार्जर अनिवार्य केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in