केरळमध्ये अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार : ३ मदरसा शिक्षकांना अटक

काही पालकांकडून आलेल्या तक्रारींनंतर बाल कल्याण समिती आणि पोलीस यांनी ही कारवाई केली
केरळमध्ये अल्पवयीन मुलांवर लैंगिक 
अत्याचार : ३ मदरसा शिक्षकांना अटक

थिरुवअनंतपूरम : अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपावरून मदरशांमधील तीन शिक्षकांना केरळ पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.

केरळमधील नेदुमंगडू येथील एका मदरशामध्ये हे शिक्षक मुलांवर लैगिंक अत्याचार करीत होते आणि अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यातील तीनही आरोपींपैकी एक मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. काही पालकांकडून आलेल्या तक्रारींनंतर बाल कल्याण समिती आणि पोलीस यांनी ही कारवाई केली असून संबंधित गुन्हा पॉस्को अंतर्गत दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in