मल्याळम चित्रपटसृष्टीत महिलांचे लैंगिक शोषण; न्यायमूर्ती हेमा कमिटीच्या अहवालातून माहिती उघड

मल्याळम चित्रपटसृष्टीत महिलांचे लैंगिक शोषण; न्यायमूर्ती हेमा कमिटीच्या अहवालातून माहिती उघड

मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिलांचा छळ, लैंगिक शोषणाबाबतच्या धक्कादायक बाबी न्यायमूर्ती हेमा कमिटीच्या अहवालातून समोर आल्या आहेत.
Published on

तिरुनंतपुरन : मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिलांचा छळ, लैंगिक शोषणाबाबतच्या धक्कादायक बाबी न्यायमूर्ती हेमा कमिटीच्या अहवालातून समोर आल्या आहेत. एक गुन्हेगारी टोळी यावर नियंत्रण ठेवून असल्याचा आरोपही या अहवालातून करण्यात आला आहे.

मूठभर निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आणि प्रॉडक्शन कंट्रोलर यांच्यावर पॅनेलच्या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे.

मल्याळम सिनेमातील लैंगिक छळ आणि लैंगिक असमानतेच्या मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी केरळ सरकारने पॅनेलची स्थापना केली होती. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या या पॅनेलच्या अहवालात मल्याळम चित्रपट क्षेत्रातील महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

तडजोड करण्यास तयार असलेल्या महिला कलाकारांना सांकेतिक नावे दिली जातात, असे या अहवालात म्हटले आहे. जे नकार देतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे या अहवालातून समोर आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in