स्वातंत्र्योत्तर सत्ताधाऱ्यांना 'स्वसंस्कृतीची लाज', पंतप्रधान मोदींची टीका

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची सत्ता मिळालेल्या पक्षाला स्वत:च्या संस्कृतीची लाज वाटत होती. ते मंदिरांचे महत्त्व कळूच शकले नाही.
स्वातंत्र्योत्तर सत्ताधाऱ्यांना 'स्वसंस्कृतीची लाज', पंतप्रधान मोदींची टीका

गुवाहाटी : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची सत्ता मिळालेल्या पक्षाला स्वत:च्या संस्कृतीची लाज वाटत होती. ते मंदिरांचे महत्त्व कळूच शकले नाही. उलट राजकीय कारणांमुळे त्यांना त्यांच्या संस्कृतीची लाजच वाटत होती, अशी टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी येथे भव्य सभेला संबोधित करताना केली. तेथे त्यांनी ११६०० कोटी मूल्याच्या प्रकल्पांचे अनावरण केले. ते म्हणाले की, कोणताही देश आपला इतिहास विसरून विकास साधू शकत नाही.

आसाममधील विकास प्रकल्पांबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, कामाख्य मंदिर कॉरिडॉर प्रकल्प ४९८ कोटी रुपये खर्चून राबवण्यात येणार आहे. एकदा का तयार झाले की, या शक्तिपीठाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रिघ लागेल. यामुळे येथील पर्यटनाचा विकास होईल. परिणामी आसाम ईशान्य भारताचे प्रवेशद्वार होईल. हजारो वर्षांच्या आव्हानानंतर देखील ही मंदिरे म्हणजे आपल्या संस्कृतीची प्रतीके असून त्यामुळे आपल्या संस्कृतीचे रक्षण झाले आहे. कामाख्य कॉरिडॉरला 'कामाख्य दिव्यलोक परियोजना' असे नाव देण्यात आले असून यामुळे शक्तिपीठाकडे पुन्हा भाविकांची रिघ सुरू होईल. स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारच्या आपल्या मंदिरांचे महत्त्व लक्षात आले नाही. राजकीय कारणांमुळे त्यांना आपल्या संस्कृतीची लाज वाटत होती.

logo
marathi.freepressjournal.in