शमी आणि श्रेयस अय्यर हे मुख्य संघात असायला हवे होते- अझरुद्दीन

शमी आणि श्रेयस या दोन खेळाडूंना संघात स्थान न मिळाल्याने अझरुद्दीन यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
शमी आणि श्रेयस अय्यर हे मुख्य संघात असायला हवे होते- अझरुद्दीन

टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यर हे राखीव खेळाडू म्हणून असण्याऐवजी मुख्य संघात असायला हवे होते, असे मत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी व्यक्त केले. त्यांनी एक ट्विट सुद्धा केले असून त्याची सोशल मिडीयावर चर्चा होत आहे.

शमी आणि श्रेयस या दोन खेळाडूंना संघात स्थान न मिळाल्याने अझरुद्दीन यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, या दोन खेळाडूंमध्ये सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. दरम्यान, मोहम्मद शमीसारख्या खेळाडूंना संघात समाविष्ट न केल्याने अनेक क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल अशी अपेक्षाही चाहत्यांनी शक्यता व्यक्त केली होती. दरम्यान, बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील बहादूरगंज विधानसभेचे माजी आमदार तौसीफ आलम यांनी जोपर्यंत संघाच्या निवडप्रक्रियेत बदल होत नाही तोपर्यंत आपण सामना बघणारच नाही, असा पण केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in