शंकर महादेवन, झाकीर हुसेन यांना ग्रॅमी, 'धिस मोमेंट' अल्बमसाठी 'शक्ती' फ्यूजन म्युझिक ग्रुपचा सन्मान

यंदाच्या ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतीय संगीतकार शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांच्या 'शक्ती' फ्यूजन म्युझिक ग्रुपला 'धिस मोमेंट' अल्बमसाठी बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम अवॉर्ड प्राप्त झाला आहे.
शंकर महादेवन, झाकीर हुसेन यांना ग्रॅमी, 'धिस मोमेंट' अल्बमसाठी 'शक्ती' फ्यूजन म्युझिक ग्रुपचा सन्मान

लॉस एंजेलिस : यंदाच्या ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतीय संगीतकार शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांच्या 'शक्ती' फ्यूजन म्युझिक ग्रुपला 'धिस मोमेंट' अल्बमसाठी बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम अवॉर्ड प्राप्त झाला आहे. याशिवाय झाकीर हुसेन यांच्या पश्तो या रचनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असलेल्या ॲबन्डन्स इन मिलेट्स या रचनेचा पराभव करून बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स ग्रॅमी अवॉर्डही जिंकले.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे सोमवारी (स्थानिक वेळेनुसार रविवारी) संगीत क्षेत्रातील मानाच्या ग्रॅमी पुरस्कारांचा वितरण सोहळा शानदारपणे पार पडला. त्यात भारतीय संगीतकारांनी मोठी बाजी मारली. भारतीय संगीतकार शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन या जोडीचे सुसान बाका, बोकांते, बर्ना बॉय आणि डेव्हिडो यांसारख्या जागतिक ख्यातीच्या कलाकारांसह नामांकन झाले होते. त्यात भारतीयांनी बाजी मारत यंदाचा बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार जिंकला. झाकीर हुसेन यांनी पश्तो या रचनेसाठी बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स ग्रॅमी अवॉर्डही मिळवले. पश्तोसाठी हुसेन यांनी बेला फ्लेक, एडगर मेयेर, राकेश चौरसिया यांच्यासह काम केले आहे. त्याच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी, फालू आणि गौरव यांच्या अॅबन्डन्स इन मिलेट्स या रचनेचे प्रमुख आव्हान होते. पण त्यावर मात करत हुसेन यांच्या पश्तोने पुरस्कार पटकावला. पंतप्रधान मोदी यांनी या पुरस्कारप्राप्तीबद्दल भारतीय कलाकारंचे अभिनंदन केले आहे. टेलर स्विफ्टने यावर्षीच्या ग्रॅमी अवॉर्ड‌्समध्ये विक्रम केला. अल्बम ऑफ द इयरचा पुरस्कार सलग चार वेळा जिंकणारी ती पहिली कलाकार ठरली आहे. या सुपरस्टारने यापूर्वी स्टीव्ही वंडर, पॉल सायमन आणि फ्रँक सिनात्रा यांच्यासोबत तीन सर्वोत्कृष्ट अल्बम जिंकले होते. तिला सेलिन डायोनकडून बक्षीस मिळाले. समारंभात मायली सायरस आणि बिली इलिश यांनी इतर सर्वोच्च पुरस्कार पटकावले. ऑप्रा विन्फ्रे यांनी मायली सायरस यांच्यासह फ्लॉवर्स या रचनेवर सादर केलेले दिमाखदार संगीत आणि नृत्य कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

ग्रॅमी पुरस्कारांचे अन्य मानकरी

  • अल्बम ऑफ द इयर - टेलर स्विफ्ट

  • (मिडनाइट्स)रेकॉर्ड ऑफ द इयर - मायली

  • सायरस (फ्लॉवर्स)साँग ऑफ द इयर - बिली

  • इलिश (व्हॉट वॉज आय मेड फॉर?)बेस्ट न्यू

  • आर्टिस्ट - व्हिक्टोरिया मोनेट

logo
marathi.freepressjournal.in