शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या जीवाला धोका : शिष्यांचा दावा

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याभोवतीचा निर्माण झालेला वाद शांत होण्याचे नाव घेत नाही. प्रयागराजच्या माघ मेळ्यात मौनी अमावस्येच्या स्नानावेळी चर्चेत आलेल्या शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिष्यांनी आपल्या गुरूंच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर शिबिराच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या जीवाला धोका : शिष्यांचा दावा
Published on

प्रयागराज : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याभोवतीचा निर्माण झालेला वाद शांत होण्याचे नाव घेत नाही. प्रयागराजच्या माघ मेळ्यात मौनी अमावस्येच्या स्नानावेळी चर्चेत आलेल्या शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिष्यांनी आपल्या गुरूंच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर शिबिराच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिष्यांनी आरोप केला की, शिबिराच्या चारही बाजूंनी वेष बदलून काही समाजघातक घटक फिरत आहेत. ते कधीही अप्रिय घटना घडवू शकतात किंवा कट रचू शकतात. याचा विचार करून शिबिरात उच्च दर्जाचे १० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तसेच देखरेखीसाठी कंट्रोल रूम उभारला आहे. स्क्रीनवर शिबिर आणि परिसरातील सर्व हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. मात्र मौनी अमावस्येपासूनच मेळा पोलीस प्रशासनाकडून शिबिराच्या आजूबाजूला सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. गुप्तचर विभाग याकडे लक्ष ठेवून आहे.

जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी यांचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी शैलेंद्र योगिराज सरकार यांनी सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने १० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. कारण प्रशासनाकडून रात्रीच्या अंधारात येऊन नोटिसा चिकटवल्या जातात. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ये-जा करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. त्यांनी आरोप करताना सांगितले की साध्या वेशात अनेक गुप्तचर तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या संस्था टेहळणी करत आहे. त्यामुळे कोण येत आहे, कोण जात आहे यावर लक्ष ठेवणे आवश्यक झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in