शंकराचार्यांना स्नानाला जाण्यापासून रोखले; पोलिसांच्या कारवाईला जोरदार विरोध

माघ मेळ्याच्या मौनी अमावास्याच्या स्नानासाठी निघालेले शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या पालखीला पोलिसांनी रोखले. शंकराचार्यांना रोखल्याने मोठा वाद निर्माण झाला.
शंकराचार्यांना स्नानाला जाण्यापासून रोखले; पोलिसांच्या कारवाईला जोरदार विरोध
शंकराचार्यांना स्नानाला जाण्यापासून रोखले; पोलिसांच्या कारवाईला जोरदार विरोध
Published on

प्रयागराज : माघ मेळ्याच्या मौनी अमावास्याच्या स्नानासाठी निघालेले शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या पालखीला पोलिसांनी रोखले. शंकराचार्यांना रोखल्याने मोठा वाद निर्माण झाला.

मात्र, माघ मेळा क्षेत्रात वाहनांना बंदी घातली असल्यानेच हा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

शंकराचार्यांचे समर्थक व पोलिसांमध्ये जोरदार वाद व धक्काबुक्की झाली. त्यामुळे मेळा क्षेत्रात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. शिष्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ शंकराचार्यांनी स्नान करण्यास नकार दिला.

मौनी अमावस्येनिमित्त संगम क्षेत्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. त्यामुळेच पोलिसांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या ताफ्याला संगमावर जाण्यापासून रोखले.

पोलिसांनी वाहनांचा ताफा रोखल्यानंतर शंकराचार्यांचे समर्थक व पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. दोन्ही पक्षांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी शंकराचार्यांच्या समर्थकांना धक्का दिला. त्यामुळे संतांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही शंकराचार्यांना पायी जाण्याची विनंती केली. तर मंडल अधिकारी सौम्या अग्रवाल यांनी सांगितले की, परवानगीशिवाय रथाद्वारे जाण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही.

४ कोटी भाविकांनी केले पवित्र स्नान

माघ मेळ्यातील प्रमुख स्नानपर्व असलेल्या मौनी अमावस्येनिमित्त रविवारी सायंकाळीपर्यंत गंगा नदीच्या संगमात ३ कोटी ८२ लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मेळा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दाट धुक्याला न जुमानता भाविक मध्यरात्रीपासूनच गंगा आणि संगम घाटांकडे येऊ लागले आणि पहाटेच्या वेळेत सर्व दिशांनी भाविकांची गर्दी सुरूच होती.

logo
marathi.freepressjournal.in