शिंजो आबेंच्या पक्षाला जपानच्या निवडणुकीत घवघवीत यश

निवडणुकीत २०१९च्या निवडणुकीहून जास्त म्हणजे ५२.०५ टक्के मतदारांनी मतदान केले होते
 शिंजो आबेंच्या पक्षाला जपानच्या निवडणुकीत घवघवीत यश

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येनंतर दोन दिवसांनी झालेल्या निवडणुकीत त्यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने (एलडीपी) घवघवीत यश संपादन केले आहे. सत्ताधारी एलडीपीच्या कोमिटो आघाडीने ७६ जागा जिंकत आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. या निवडणुकीत २०१९च्या निवडणुकीहून जास्त म्हणजे ५२.०५ टक्के मतदारांनी मतदान केले होते.

या विजयामुळे २४८ सदस्यीय वरिष्ठ सभागृहात एलडीपीचे संख्याबळ वाढून १४६ वर पोहोचले आहे. तर विरोधी बाकावरील डेमोक्रॅटिक पक्षाचा आकडा २३ जागांनी घटून २०च्या खाली पोहोचला आहे. एलडीपी पक्षाची ही २०१३ नंतरची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

“या विजयानंतर आम्ही शिंजो आबेंना श्रद्धांजली वाहत आहोत. हा आपल्या लोकशाहीचा विजय आहे. हिंसाचारामुळे आपल्या लोकशाहीची मुळे व निवडणूक प्रक्रियेला संकटात टाकण्यात आले; पण मी या निवडणुकीसाठी पूर्णतः सज्ज होतो,” असे जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in