शिराझीच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ

असगर शिराझी याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली
शिराझीच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ
Published on

अमली पदार्थांचा तस्कर अली असगर शिराझी याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. दाऊद इब्राहिमशी संबंध व अमली पदार्थ दहशतवादाला निधी पुरवठ्याबाबत अधिक तपास करायचा असल्याची मागणी पोलिसांनी केली. यावर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी शिराझीला आणखी पाच दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी आपल्या अर्जात शिराझीच्या हसलर्स हॉस्पिटॅलिटी कंपनीच्या क्लाउड किचनमध्ये केलेल्या गुंतवणुकीवरील आणि अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियामध्ये कुरिअर कंपन्यांद्वारे अमली पदार्थांची तस्करी करणारा दाऊद इब्राहिमचा सहकारी कैलाश राजपूत याच्याशी असलेल्या संबंधांवरील ‘द फ्री प्रेस जर्नल’मधील बातम्यांची माहिती दिली.

शिराझीशी संबंधित २० जणांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. त्यात हसलर्स हॉस्पिटॅलिटीचे प्रवर्तक कृणाल ओझा, महाराष्ट्र गॅस कंपनीचे संचालक मुंजी, इंटरनॅशनल एक्स्प्रेस कुरियर कंपनीचे संचालक, वन लॉजिस्टीक, पॅन फ्रेट, फलिशा ग्रुपचे संचालक मेहरीन शिराझी, सीए भावेश नलावडे, अकाऊंटंट झा, रिद्धी सावंत यांचे जबाब नोंदवले आहेत. शिराजीच्या कुरियर, लॉजिस्टीक, रेस्टॉरंट, क्लाऊड किचन व अन्य क्षेत्रातील कंपन्यांचा व्यवसाय हा मनी लँडरिंगसाठी केला जात असावा, असा संशय पोलिसांनी केला आहे. शिराझीने त्याच्या व्यवसाय व गुंतवणुकीबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली.

अनेक कुरियर कंपनीत त्याची गुंतवणूक आहे. या आधारे तो युरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियात अंमली पदार्थ पाठवतो. त्याचे ड्रम माफिया कैलास राजपूत याच्याशी संबंध असल्याचे उघड झाले आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

शिराझीने एप्रिल व मेमध्ये ३० अमली पदार्थांचे पार्सल इंग्लंडमध्ये पाठवले. त्यातून अमली पदार्थांचे वितरण, गुंतवणूक, मनी लँडरिंग आदींची माहिती मिळाली. या गुप्त डेटाच्या माहितीचे फोरेन्सिक ऑडिट होणे गरजेचे आहे. मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला पकडल्यावर अलिया असगरने त्याला फोन फॉरमॅट करून टाकला. त्यात काही व्हॉटस‌्ॲॅप चॅट होते. त्यात अमली पदार्थांच्या वाहतुकीची व छायाचित्राची त्यात माहिती होती.

logo
marathi.freepressjournal.in