एव्हरेस्टवर उडी मारणारी पहिली महिला शितल महाजन यांचा नवा विक्रम

महाजन यांनी एव्हरेस्ट प्रदेशात अनेक स्कायडाइव्हजची उल्लेखनीय मालिका पूर्ण केली आहे.
एव्हरेस्टवर उडी मारणारी पहिली महिला शितल महाजन यांचा नवा विक्रम

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध भारतीय स्कायडायव्हर शितल महाजन माउंट एव्हरेस्टसमोर २१,५०० फूट उंचीवरून हेलिकॉप्टरमधून उडी मारून जगातील पहिली महिला बनण्याचा विक्रम केला आहे. पद्मश्रीप्राप्त आणि अनेक स्कायडायव्हिंग रेकॉर्ड धारक महाजन (वय ४१) यांनी १३ नोव्हेंबर रोजी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टच्या पुढच्या बाजूला स्कायडायव्हिंग पूर्ण केले.

मी माऊंट एव्हरेस्टच्या २१,५०० फुटांवरून माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम उडी मारली आणि १७,४४४ फूट उंचीवरील कालापत्थरवर उतरले. अशा प्रकारचे सर्वोच्च उंचीचे स्कायडायव्हिंग लँडिंग मी पूर्ण केले, असे त्यांनी फेसबुक पेजवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. महाजन यांनी एव्हरेस्ट प्रदेशात अनेक स्कायडाइव्हजची उल्लेखनीय मालिका पूर्ण केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in