

नवी दिल्ली : नीट परीक्षेत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा वा त्यांनी तो द्यावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच पार्टीच्या समर्थनार्थ बेमुदत उपोषणास बसलेल्या पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांची गुरुवारी दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिल्लीत भेट घेतली.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे यावेळी वांगचूक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बोलणे झाले. त्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा निसंदिग्ध पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
‘हे सरकार निर्दयी आहे. त्याना समाजातील चांगल्या आणि देशप्रेमी माणसांची, त्यांच्या न्यायहक्काची किंमत नाही. तुमचे आंदोलन सुरू होऊन १० दिवस झाले तरी सरकारचे कुणीही प्रतिनिधी फिरकलेले नाहीत यावरूनच आपण हे ओळखा. त्यामुळे काळजी घ्या’, असा सल्लाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. यावेळी कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दीपकेही उपस्थित होते. त्यांच्याशीही उद्धव यांचे बोलणे झाले.