तुनिषा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिझान खानला शनिवारी जामीन मंजूर

शिझान गेल्या अडीच महिन्यांपासून ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता
तुनिषा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिझान खानला शनिवारी जामीन मंजूर

अभिनेता शिझान खान टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येमुळे वादात सापडला होता. मात्र आता तुनिषा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिझान खानला शनिवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. आत्महत्या प्रकरणातील सुनावणीनंतर जवळपास अडीच महिन्यांनी या अभिनेत्याला दिलासा मिळाला आहे. 

निकालाची प्रत मिळाल्यानंतर शिझानला कोणत्या अटींवर जामीन मंजूर झाला हे कळेल. महत्त्वाचं म्हणजे शिझानला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर येत आहे. शिझान गेल्या अडीच महिन्यांपासून ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. अभिनेत्रीने 'अली बाबा: दास्तान ए काबुल'च्या सेटवर आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. तुनिषाने शिझान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर हा अभिनेता वादात सापडला होता. मुलीच्या आत्महत्येनंतर तुनिषाच्या आईने शिझानवर अनेक गंभीर आरोप केले. तुनिषा शर्माच्या आईने केलेल्या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी शिझानला अटक केली. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in