सर्वसामान्यांना झटका! स्वयंपाकाचा गॅस ५० रुपयांनी महाग

पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांची वाढ केल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने आणखी एक झटका देत एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ जाहीर केली.
सर्वसामान्यांना झटका! स्वयंपाकाचा गॅस ५० रुपयांनी महाग
Published on

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांची वाढ केल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने आणखी एक झटका देत एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ जाहीर केली. त्यामुळे सिलिंडर ५० रुपयांनी महागणार आहे.

विशेष म्हणजे ही दरवाढ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) लाभार्थी आणि गैर-लाभार्थी दोघांनाही लागू आहे. सुधारित किमती ८ एप्रिलपासून लागू होणार आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गॅस सिलिंडरची किंमत ५०० रुपयांवरून ५५० रुपयांपर्यंत वाढेल. इतर ग्राहकांसाठी, ती ८०३ रुपयांवरून ८५३ रुपयांपर्यंत वाढणार असल्याची माहिती पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली.

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढीचा उद्देश ग्राहकांवर भार टाकण्याचा नाही. त्याचबरोबर अनुदानित गॅसच्या किमती वाढविल्यामुळे तेल विपणन कंपन्यांच्या ४३,००० कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई करण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in