
राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात एका आदिवाशी महिलेला मारहाण करून तिची नग्नावस्थेत परेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांना शनिवारी याबाबतची माहिती मिळाली. याप्ररणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पीडित आदिवासी महिलेला तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी मारहाण करून नग्नावस्थेत तिला घेऊन गेले. पीडितेचे वर्षभरापूर्वी लग्न झालं होत. ती गावातल्याच दुसऱ्या पुरुषासोबत राहत होती असा आरोप तिच्यावर केला आहे .
जिल्हा पोलिस अधीक्षक (एसपी) अमित कुमार यांनी या माहितीला दुजोरा दिला. महिलेच्या पतीसह अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना पाहून आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांपासून पळ काढताना ते जखमी झाले. त्यांच्यावर प्रतापगड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे