विमान प्रवाशांसाठी धक्कादायक बातमी,विमान प्रवास आणखी महागणार ?

अहवालानुसार, गेल्या सहा महिन्यांत हवाई इंधनाच्या किमतीत ९१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे
विमान प्रवाशांसाठी धक्कादायक बातमी,विमान प्रवास आणखी महागणार ?

गुरुवारी विमान प्रवाशांसाठी धक्कादायक बातमी आली. वास्तविक, जेट इंधन किंवा एअर टर्बाइन इंधन (एटीएफ) ची किंमत पुन्हा एकदा १६.३ टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे मार्च २०२२ नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे जेट इंधनाच्या किमतीने विक्रमी पातळी गाठली आहे.

अहवालानुसार, गेल्या सहा महिन्यांत हवाई इंधनाच्या किमतीत ९१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या नव्या बदलानंतर राजधानी दिल्लीत एटीएफची किंमत १.४१ लाख रुपये प्रति किलोलीटरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. दिल्लीत हवाई इंधन एव्हीएशन टर्बाइन फ्यूएलचा (हवाई इंधन) दर १,४१,००० रुपये किलो लिटर झाला आहे. मुंबईत तो १,४०,०९२.७४ रुपये इतका वाढला आहे. चेन्नईत एटीएफचा भाव १,४६,२१५.८५ रुपये झाला असून कोलकात्यात तो १,४६,३२२.२३ रुपये इतका विक्रमी पातळीवर गेला आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याला १ आणि १५ तारखेला इंधन दरांचा आढावा घेतला जातो. यापूर्वी १ जून रोजी कंपन्यांनी हवाई इंधन दरात १.३ टक्के कपात केली होती. या वर्षी १६ मार्च रोजी एटीएफमध्ये सर्वाधिक १८.३ टक्के वाढ झाली आहे. त्यानंतर १ एप्रिललाही दोन टक्क्यांनी भाव वाढले. याशिवाय १६ एप्रिल रोजी ०.२ टक्का आणि १ मे रोजी ३.२२ टक्के वाढ झाली होती.

सलग दहा वाढीनंतर विमान इंधनाच्या किमतीत १ जून रोजी किरकोळ १.३ टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. पण, आता पुन्हा त्याची किंमत वाढली असून आगामी काळात विमान प्रवास आणखी महाग होण्याची शक्यता आहे.

एटीएफच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्यानंतर लगेचच, अजय सिंग, सीएमडी, स्पाइसजेट म्हणाले की जेट इंधनाच्या किमतीत तीव्र वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे देशांतर्गत विमान कंपन्यांकडे तात्काळ भाडे वाढवण्याशिवाय पर्याय उरला नाही आणि तसे करणे तातडीची गरज आहे. कामकाजाचा खर्च योग्य राहील याची खात्री करण्यासाठी भाडे किमान १० ते १५ टक्क्यांनी वाढवणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in