ऐन उन्हाळ्यात रेलनीरचा तुटवडा

उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उन्हाचे चटके बसत असताना प्रवासादरम्यान तहान भागवण्यासाठी स्वस्तातील रेलनीर बाटलीला पसंती देतात
ऐन उन्हाळ्यात रेलनीरचा तुटवडा

उपनगरीय रेल्वेमार्गावर दैनंदिन कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. प्रखर उष्णतेचा मे महिना सुरू असताना दुसऱ्या बाजूला रेल्वे स्थानकांवरील स्टाॅल्सवर रेलनीर पाण्याच्या बाटल्यांचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे बहुतांश वेळा प्रवाशांना तहानलेल्या अवस्थेतच प्रवास करावा लागत आहे.

आयआरसीटीसीद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी ‘रेलनीर’ नावाच्या पाण्याच्या तयार केल्या जातात. अंबरनाथ येथील रेलनीरच्या प्रकल्पातून बाटल्याचे वितरण मध्य, पश्चिम, कोकण रेल्वेच्या स्थानकात केले जाते. प्रत्येक रेल्वे स्थानकातील स्टाॅलवर एका लीटरच्या बाटलीसाठी १५ रुपये आकारले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उन्हाचे चटके बसत असताना प्रवासादरम्यान तहान भागवण्यासाठी स्वस्तातील रेलनीर बाटलीला पसंती देतात. मात्र उपनगरीय रेल्वे मार्गावरील अनेक स्टाॅलवर रेलनीरचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक स्टाॅलधारक रेलनीर व्यतिरिक्त इतर कंपनीच्या पाण्याच्या बाटल्या ठेवतात. अशातच रेलनीरच्या अंबरनाथ येथील प्रकल्पातून बाटली बंद पाणी तयार करण्याची क्षमता अद्याप वाढवण्यात आली नाही. दरम्यान, रेलनीरचा बाटल्यांचा पुरवठा आयआरसीटीसीने वाढवावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

उन्हाळ्यात रेलनीरच्या बाटल्याचा तुटवडा जाणवणे हे नवीन नाही. योग्य नियोजन नसल्याने अशी वेळ येते. आयआरसीटीसीने नियोजनबद्ध पाण्याच्या बाटल्याचे वितरण करणे अपेक्षित आहे.

- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in