कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

इंग्लंडमध्ये कोरोना काळात ‘एक्स्ट्राजेनिका’ची लस घेणाऱ्यास ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो, अशी कबुली ‘एक्स्ट्राजेनिका’ कंपनीने तेथील न्यायालयात दिल्यानंतर त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी भारतात उमटले.
कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये कोरोना काळात ‘एक्स्ट्राजेनिका’ची लस घेणाऱ्यास ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो, अशी कबुली ‘एक्स्ट्राजेनिका’ कंपनीने तेथील न्यायालयात दिल्यानंतर त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी भारतात उमटले. कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामांची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती बनवण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

ॲॅड. विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली. भारतात पहिली कोरोना लस कोविशिल्ड होती. तिची निर्मिती पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने केली. या लसीचा फॉर्म्युला ब्रिटिश औषध कंपनी ‘एक्स्ट्राजेनिका’कडून घेण्यात आला होता.

कोविशिल्ड दुष्परिणामाच्या तपासणीसाठी तज्ज्ञांचे पथक नेमा

कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामाच्या तपासासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक बनवण्याचे आदेश द्यावेत. यात ‘एम्स’ दिल्लीच्या तज्ज्ञांचा समावेश असावा, या समितीचे प्रमुखपद ‘एम्स’च्या संचालकांकडे द्यावे व या तपासावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशाकडे सोपवावी. कोविशिल्ड लसीचे दुष्परिणाम काय आहेत? ते किती गंभीर आहेत, याचा तपास केला जावा. लस घेतल्यावर कोणाला गंभीर आजार झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई द्यावी, आदी मागण्या या याचिकेत करण्यात आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in