Shraddha Murder Case : 'हो, मीच केली श्रद्धाची हत्या'; कोर्टासमोर नेमकं काय म्हणाला आफताब?

श्रद्धा वालकर प्रकरणात (Shraddha Murder Case) आरोपी असलेल्या आफताब पुणावालाने अखेर साकेत कोर्टात कबुली दिली असून अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
Shraddha Murder Case : 'हो, मीच केली श्रद्धाची हत्या'; कोर्टासमोर नेमकं काय म्हणाला आफताब?

संपूर्ण देशाला श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने (Shraddha Murder Case) हादरवून सोडले. यामध्ये आरोपी असलेल्या आफताब पुनावालाने आता साकेत कोर्टासमोर कबुली दिली आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये सुरु आहे. कोर्टाने आफताबच्या कोठडीमध्ये चार दिवसांची वाढ केली आहे. "मला काही गोष्टी आठवत नाहीत. पण मी रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली आहे." अशी कबुली त्याने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आफताबच्या पोलीस कोठडीच चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आफताब हा सतत पोलिसांची दिशाभूल करत असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली होती. यावरून कोर्टाने त्याच्या नार्को टेस्टची परवानगी दिली आहे. पण त्याआधी त्याची पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे. या प्रकरणामध्ये एका वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी याचिका दाखल करत दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in