Shraddha Murder Case : श्रद्धाची हत्या पूर्वनियोजित होती? आफताबने पॉलीग्राफी चाचणीत केले धक्कादायक खुलासे

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणांमध्ये (Shraddha Murder Case) आता अनेक खुलासे आरोपी आफताबकडून करण्यात आले आहेत.
Shraddha Murder Case : श्रद्धाची हत्या पूर्वनियोजित होती? आफताबने पॉलीग्राफी चाचणीत केले धक्कादायक खुलासे
Published on

मुंबईतील श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Murder Case) समोर आले आणि सर्वांनाच धक्का बसला. यासंदर्भात आता मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी आफताब तपासामध्ये दिशाभूल करत असल्याचे सांगत पॉलिग्राफ चाचणी करण्याची मागणी मान्य झाल्यानंतर आता अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. या चाचणी दरम्यान, आफताबनेच श्रद्धाचा खून केल्याची कबुली दिली आहे. पण यामध्ये सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, तिच्या खुनाचा कट खूप आधीपासून रचला असल्याची माहितीदेखील समोर अली आहे. आफताबने दिलेल्या या कबुलीमुळे तपासाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण, आधी त्याने नशेमध्ये असताना भांडणानंतर श्रद्धाचा खून केल्याचा दावा केला होता.

आफताबच्या पॉलिग्राफ चाचणीतून आणखी काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्याने खून करण्यासाठीच श्रद्धाला मुंबईतून दिल्लीला आणले होते. तसेच, त्याला श्रद्धाची हत्या केल्याचा पश्चात्ताप नसल्याचेही कबूल केले. आफताबच्या कुटुंबाला या खुनाची माहिती नव्हती, असेदेखील या चाचणीमध्ये स्पष्ट झाले आहे. पॉलिग्राफ चाचणीचा अंतिम अहवाल तयार करण्यात येत असून हत्येशी संबंधित अनेक गोष्टीचा उलगडा होण्यास पोलिसांना मदत होणार आहे. पॉलिग्राफ चाचणीनंतर आता आरोपी आफताबची गुरुवारी, एक डिसेंबर रोजी नार्को चाचणी होणार आहे. पॉलिग्राफ चाचणी आधी आफताबची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in