मुस्लिम महिलांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी 'शुक्रिया मोदी भाईजान'

ना दुरी है, ना खाई है, मोदी हमारा भाई है, या टॅगलाइनसह, किमान १००० मुस्लिम महिलांना पक्षाकडे आकर्षित करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
मुस्लिम महिलांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी 'शुक्रिया मोदी भाईजान'

लखनऊ : मुस्लिम महिलांना पक्षाकडे खेचण्यासाठी भाजपची अल्पसंख्याक आघाडी पुढील आठवड्यात उत्तर प्रदेशातील सर्व लोकसभा मतदारसंघात 'शुक्रिया मोदी भाईजान' मोहीम सुरू करणार आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी ही मोहीम सुरू होईल.

ना दुरी है, ना खाई है, मोदी हमारा भाई है, या टॅगलाइनसह, किमान १००० मुस्लिम महिलांना पक्षाकडे आकर्षित करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

उत्तर प्रदेश भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष कुंवर बासित अली यांनी शनिवारी सांगितले की, मोहिमेअंतर्गत मुस्लिम महिलांना नरेंद्र मोदी सरकारने त्यांच्यासाठी केलेल्या कामांबद्दल सांगितले जाईल आणि भाजपला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

ही मोहीम २ जानेवारीपासून सुरू होणार असून २० जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे, असे सांगून अली म्हणाले की, अलीकडेच राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मुस्लिम महिलांनी मोदी सरकारच्या योजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानणारे निवेदन दिले. हाच ट्रेंड पुढे नेत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात (राज्यातील) 'शुक्रिया मोदी भाईजान' कार्यक्रम आयोजित केले जातील.

'शुक्रिया मोदी भाईजान' या मोहिमेला नाव देण्यामागचे एक कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांमध्ये मुस्लिम महिलांना प्राधान्य देऊन भावा-बहिणीचे नाते प्रस्थापित केल्याचे अली म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in