'ते' पत्र अखेर वाहन संघटनेकडून मागे; E20 इंधनाबाबतची आकडेवारीत स्पष्टता हवी!

वाहन उद्योगाची सर्वोच्च संस्था 'सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स' (सिआम) ने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला लिहिलेले पत्र मागे घेतले आहे.
'ते' पत्र अखेर वाहन संघटनेकडून मागे; E20 इंधनाबाबतची आकडेवारीत स्पष्टता हवी!
'ते' पत्र अखेर वाहन संघटनेकडून मागे; E20 इंधनाबाबतची आकडेवारीत स्पष्टता हवी!
Published on

नवी दिल्ली : वाहन उद्योगाची सर्वोच्च संस्था 'सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स' (सिआम) ने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला लिहिलेले पत्र मागे घेतले आहे. पत्रात ई२० इंधनातील भेसळीमुळे वाहनांमध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. अधिक प्रमाणीकरणाची गरज मांडत हे पत्र मागे घेण्यात आले आहे.

एका निवेदनात 'सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स'ने म्हटले आहे की, "संबंधित पत्रव्यवहार" हा उद्योग संस्था, तेल विपणन कंपन्या, ऑटो (मूळ उपकरण उत्पादक) आणि चाचणी एजन्सीसह विविध भागधारकांमध्ये होणाऱ्या नियमित आणि तांत्रिक चर्चेचा एक भाग होता.

पत्रव्यवहारात नमूद केलेल्या काही आकडेवारीसाठी देशभरातील विविध क्षेत्रांतून विस्तृत डेटा गोळा करून आणि आमच्या सदस्य कंपन्यांसोबत सर्वसमावेशक चर्चा करून प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता आहे, असे वाहन उद्योग संस्थेने म्हटले आहे.

संस्थेने म्हटले आहे की, प्रसिद्ध आकडेवारीला प्रमाणीकरणाची गरज आहे, त्यामुळे सिआम पूर्वीचा पत्रव्यवहार मागे घेत आहे. मागे घेतलेल्या पत्रात नमूद केले होते की, ई२० इंधनामुळे समस्या निर्माण झालेल्या वाहनांमधील इंधनात क्लोराईड जास्त आहे.

ई२० इंधनात अती ओलावा होता...

सिआमच्या सदस्यांनी पेट्रोल पंपांवर मिळणाऱ्या ई२० इंधनात अतिप्रमाणात ओलावा असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. १ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्यास इंधन वेगळे होते आणि इंधन भरल्यानंतर लगेचच वाहन बंद पडते, असे त्यांनी नमूद केले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in