मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला! सिद्दरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब, शपथविधीची तारीखही ठरली

सिद्धरामय्या यांच्या नावावर मुख्यंमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाले असून 20 मे रोजी शपतविधी होणार असल्याचे एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे.
मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला! सिद्दरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब, शपथविधीची तारीखही ठरली

संपुर्ण देशाचे लक्ष असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी 10 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली, तर 13 मे रोजी मतमोजणी झाली. संपुर्ण देशात विजयी घोडदौड कायम ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा या निवडणुकीत सुपडा साफ करत काँग्रेस स्पष्ट बहूमतात सत्तेत आली. कर्नाटकात मिळालेल्या यशानंतर काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार मानल्या जाणाऱ्या सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन्ही आघाडीच्या आणि अनुभवी नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु होती. निकाल लागल्यानंतर दोन्ही नेते दिल्लीत ठाण मांडून होते. या दोन्हीपैकी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण हा तिढा सुटला असल्याचे वृत एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे. सिद्धरामय्या यांच्या नावावर मुख्यंमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाले असून 20 मे रोजी शपथविधी होणार असल्याचे एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे.

कर्नाटकात अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर सिद्दरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार यासाठी चढाओढ सुरु झाली होती. दोन्ही नेते महत्वाचे असून दोघांचे पक्षात वजन होते. त्यामुळे हा तिढा पक्षश्रेष्ठींकडे गेला. काँग्रेसने निवडणूकीपुर्वी मुख्यंमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. निवडणूकीनंतर मुख्यमंत्री कोण याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली होती. मात्र, निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यामंध्ये मुख्यमंत्री पदासाठी संघर्ष पाहायला मिळाला.

बुधवारी काय घडले?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी बुधवारी (17 मे) दिल्लीतील 'दहा जनपथ' येथे काँग्रेस नेते राहु गांधी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटून मुख्यमंत्री पदाची घोषणा होईल, असे संकेत काँग्रेसने दिले होते. मात्र, शिवकूमार यांनी जर मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर कोणतेही पद न घेता सामान्य आमदार म्हणून पक्षाचे काम करले, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय लांबणीवर पडला होता.

शिवकुमार यांनी देखील 'दहा जनपथ'वर राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली. त्यांच्या झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. पक्षश्रेष्ठींची झालेल्या चर्चेत शिवकुमार यांना दोन महत्वाचे प्रस्ताव देण्यात आले. यात, शिवकुमार यांनी 3 वर्षे मुख्यमंत्री राहावे किंवा पाच वर्षे उपमुख्यमंत्री राहुन महत्वाची खाती सांभाळावीत तसेच प्रदेशाध्यक्ष पद कायम ठेवावे. मात्र, शिवकुमार यांनी यापैकी एकही प्रस्ताव स्विकारला नाही.

कसे झाले मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब?

काल काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या बैठकीत सिद्दरामय्या आणि शिवकुमार यांच्याची चर्चा करण्यात आली. अशी माहिती कर्नाटकच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा पुष्पा अमरनाथ यांनी दिली. त्या याबाबत बोलताना म्हणाल्या की, "शिवकुमार आणि सिद्दरामय्या यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर सिद्दरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे." इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मात्र, यानंतर सिद्दयामय्या यांच्या घराबाहेर जल्लोष सुरु झाला, तर शिवकुमार यांच्या समर्थकांकडून सोनिया गांधी यांच्या घरासमोर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप चर्चा सुरु असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. तसेच "येत्या 48 ते 72 तासांत कर्नाटकचे नवे मंत्री मंडळ स्थापन करुन पहिल्याच बैठकीत दिलेले पाचही आश्वासने पुर्ण करू, तसेच ग्रॅण्ड कर्नाटक बनवण्यासाठी तयारी सुरु करणार आहोत", अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे इंचार्ज रणदीप सिंग सुरजेवाला यांनी दिली आहे. दरम्यान, आज गुरुवार (18 मे) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बंगळूर येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in