Sidhu Moose Wala Murder Case : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रारला अटक

पंजाबी प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची भरदिवसा तब्बल ३० गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
Sidhu Moose Wala Murder Case : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रारला अटक

सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची तब्बल ३० गोळ्या घालून भरदिवसा हत्या करण्यात आली होती. (Sidhu Moose Wala Murder Case) यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. त्यांच्या हत्येची जबादारी घेतलेल्या प्रमुख आरोपी गोल्डी ब्रारला (Goldy Brar) कॅलिफोर्नियात अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून अद्याप याला अधिकृतरित्या कोणताही दुजोरा दिलेला नाही.

कोण आहे गोल्डी ब्रार?

गायक मुसेवाला यांच्या हत्येचा मुख्य आरोपी गोल्डी ब्रार हा अनेक गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड आहे. त्याच्यावर फरीदकोटचा गुरलाल कुस्तीपटू आणि डेरा प्रेमी हत्या प्रकरणासह अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडात बसून तो मुसेवाला प्रकरणातील सर्व सूचना देत होता. हत्येनंतर लगेचच त्याने हल्ल्याची जबाबदारी घेतली. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. त्याच्यावर भारतात खून, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर शास्त्र पुरवठा असे अनेक गुन्हे दाखल आहेत. २९ मे रोजी जवाहरके गावात सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली होती. सहा हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाला घेराव घातला आणि गोळीबार सुरू केला. या प्रकरणी चार शूटर्सना अटक करण्यात आली आहे, तर दोन चकमकीत ठार झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in