Sidhu Moosewala case : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी सचिन थापन बिश्नोई याला भारतात आणण्यात आले

दुबईत बसून सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सचिन थापनवर आहे
Sidhu Moosewala case : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी सचिन थापन बिश्नोई याला भारतात आणण्यात आले

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करून भारतात आणण्यात आले आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी सचिन थापन बिश्नोई याला भारतात आणण्यात आले आहे. सचिनला अझरबैजानमध्ये अटक करण्यात आली होती, त्यानंतर त्याला आता भारतात आणण्यात आले आहे. दुबईत बसून सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सचिन थापनवर आहे.

सिद्धू मूसवाला यांच्या हत्येतील आरोपी सचिन थापन बिश्नोई याला पंजाब पोलिसांनी अझरबैजानमधून ताब्यात घेतले आहे. आता त्याला भारतात आणण्यात आले आहे. पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन थापन हा सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या कटात सहभागी होता. हत्येचा कट रचण्यासाठी सचिन सतत गोल्डी ब्रारच्या फोनवर संपर्कात होता आणि दोघांमध्ये अनेक संभाषण झाले. भारत सरकारच्या पाठिंब्याने सचिन थापनला अझरबैजानमध्ये अटक करण्यात आली आणि आता त्याला भारतात आणण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in